Ad will apear here
Next
रितू छाब्रिया यांना ‘एशियन बिजनेस लीडरशिप अॅवॉर्ड’ प्रदान
संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) कॅबिनेट सदस्य आणि मिनिस्टर ऑफ टॉलरन्स शेख नाहायन यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना रितू छाब्रिया

पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज संलग्नित मुकुल माधव फाउंडेशनच्या (एमएमएफ) व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया यांना नुकत्याच दुबई येथे झालेल्या सोहळ्यात ‘एशिया बिजनेस लीडरशिप अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) कॅबिनेट सदस्य आणि मिनिस्टर ऑफ टॉलरन्स शेख नाहायन यांच्या हस्ते छाब्रिया यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. छाब्रिया यांच्यासह देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या १५ मान्यवरांचा या वेळी सन्मान करण्यात आला. 

रितू छाब्रियारितू छाब्रिया यांनी आपल्या भाषणात या पुरस्काराबद्दल ‘एबीएलएफ’चे आभार व्यक्त केले. ‘पुरस्कार निवड समिती आणि सल्लागार मंडळाने केलेल्या या सन्मानाने अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. समाजात दीर्घकालीन बदल घडवण्यासाठी आणि या बदलाची परंपरा निर्माण करण्यासाठी, तसेच समाजाच्या वंचित घटकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ‘सीएसआर’ हा अतिशय प्रभावी मार्ग आहे,’ अशी भावना रितू छाब्रिया यांनी व्यक्त केली. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZXMCG
Similar Posts
रितू छाब्रिया यांना आयईबीएफ एक्सलन्स अॅवॉर्ड प्रदान पुणे : इंडो-युरोपियन बिझनेस फोरमच्या वतीने लंडनमधील हाउस ऑफ लॉर्ड येथे झालेल्या सोहळ्यात फिनोलेक्स इंडस्ट्रीज संलग्नित मुकुल माधव फाउंडेशनच्या (एमएमएफ) व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया यांना ‘आयईबीएफ एक्सलन्स अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात
महिला सक्षमीकरणासाठी ‘फ्लो हाफ मॅरेथॉन’ पुणे : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज लेडीज ऑर्गनायजेशन अर्थात ‘फिक्की फ्लो’च्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी येत्या डिसेंबरमध्ये ‘फ्लो हाफ मॅरेथॉन’ आयोजित करण्यात आली आहे. या मॅरेथॉनसाठी फिक्की फ्लो आणि ब्रिजस्टोन यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.
पुण्याची स्वराली देव आणि ओम मुरकुटे यांचे युरोपातील आइस स्केटिंग स्पर्धेत यश पुणे : इंटरनॅशनल स्केटिंग युनियनतर्फे युरोपातील बेलारूस येथे घेण्यात आलेल्या आइस स्केटिंग स्पर्धेत पुण्याची स्वराली देव आणि ओम मुरकुटे या दोघांनी यशस्वी कामगिरी केली. पंधरा वर्षांखालील मुलांच्या गटात पाचशे, हजार आणि पंधराशे मीटर स्केटिंगचे टप्पे यशस्वीपणे पार करत ओमने बेलारूस करंडक पटकावला. १९ वर्षांखालील गटात स्वराली देवने करंडक जिंकला
डॉ. पूनावाला यांना एशियन बिझनेस लीडरशिप फोरमतर्फे जीवनगौरव पुरस्कार पुणे : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना एशियन बिझनेस लीडरशिप फोरमतर्फे (एबीएलएफ) जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दुबईत आयोजित एका समारंभात डॉ. पूनावाला यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language